Author Topic: Japun....  (Read 1043 times)

Offline विजय कांबळे

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Male
Japun....
« on: December 10, 2013, 09:55:28 PM »
नातं?
कधी एकट्याचं एकट्याशी नसत
दिलेल्या हाकेला ओव द्यायला कोणीतरी असाव लागत
नातं?
कधी रडवून हसवणार
तर कधी हसता-हसता रडवणार असत
नातं?
फक्त रक्ताच नसतं
कळत नकळत जुळणार, भावनांनी बांधलेल असतं
नातं?
नावं अनेक पण भाव एकच असतो
प्रेम,माया आणि काळजी यांचा अनुभव करुन देत.
नातं?
एका छोट्याश्या चुकीने देखील तुटेल इतकं नाजुक,
तर कधी मोठ्या संकटांना पुरुन ऊरेन इतकं खंबीर असतं
नातं?
जोडायला सोपं पण जपण जरा कठीण असत
गैरसमजं आणि स्वार्थ या गोष्टी ज्या नात्यांमधे नसतात तिच शेवट पर्यंत टिकून रहातात
असच एक नातं आपलं अगदी नकळत जुळलेल.
अशी सुंदर नाती प्रत्येकाच्या नशिबात नसतात :)

Marathi Kavita : मराठी कविता