Author Topic: तुला नाही miss करणार...  (Read 3057 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
तुला नाही miss करणार...
« on: May 24, 2013, 08:52:51 PM »
तुला नाही miss करणार...

रोज तुझी आठवण आली
तु नाही आठवलेस तरी
अजिबात नाही रडणार
पण आता कधीच
तुला नाही miss करणार...

खुप काळानंतर
काही क्षण सुखाचे आले
असे वाटले होते की
सारेकाही ठीक झाले
पण ते सारे स्वप्न होते
त्या स्वप्नांत पुन्हा नाही रमणार
पण आता कधीच
तुला नाही miss करणार...

कधी खुप दुखामुळे
मन मरून जाते
जरासे कुणी प्रेम दिले
भरकटून जाते
पण आता नाही भरकटू देणार
पण आता कधीच
तुला नाही miss करणार...

ज्याला रोज प्रेम मिळते
त्याला वेदना कळत नसते
एकट्या पडलेल्या मनाचे
दुख समजत नसते
झाले कितीही दुख तरी
तुला नाही सांगणार
पण आता कधीच
तुला नाही miss करणार...

तुला खुप miss करणारे असतील
खुप हसवणारे हि असतील
पण मला कुणीच नाही
नसले जरी कुणी आता
खंत नाही करणार
पण आता कधीच
तुला नाही miss करणार...

आता मी तुझ्यापासून
खुप दूर जाणार
तुझ्या आठवणींतच राहीन
पण कधी त्रास नाही देणार
तु खुश राहा आनंदी राहा
मी नाही विसरलो तरी
मला विसरून जा
आता आणखी काही नाही फक्त
हे शेवटचेच मागणार
पण आता कधीच
तुला नाही miss करणार...
तुला नाही miss करणार...

... प्राजुन्कुश
... Prajunkush.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #1 on: May 25, 2013, 12:14:13 AM »
साधी आणि छान मांडणी .

तिला miss  नाही करणार कोण दुसरी भेटली आहे का रे? ::)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #2 on: May 25, 2013, 01:20:07 AM »
Tila Miss nahi Mrs karaychi iccha ahe mhanun...

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #3 on: May 25, 2013, 01:25:17 AM »
 :o
 :D :D :D :D :D lage raho

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #4 on: May 25, 2013, 05:44:28 PM »
manala bhavli mitra tuzi kavita......

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #5 on: May 25, 2013, 06:27:04 PM »
Rudra ji ...
... Khup abhar.

चित्रा

 • Guest
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #6 on: May 26, 2013, 11:53:22 PM »
शाळेत असताना

इतिहासातल्या पुस्तकातल्या

चांदबीबीच्या चित्रात

तिच्या तोंडावर

दाढीमिश्या रेखाटून

तिला मी औरंगजेब

एकदा केले होते;

पण आज मी

तुला वचन देतो -

तुझ्या missचा mister

तसा मी नाही करणार

कध्धीकध्धीकध्धीसुध्धा.

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #7 on: June 07, 2013, 03:15:06 PM »
Hahahaha...

SUNIL madekar

 • Guest
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #8 on: June 09, 2013, 07:31:41 PM »
mast bhava........khup chan........

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तुला नाही miss करणार...
« Reply #9 on: June 11, 2013, 06:18:04 PM »
Dhanyavad...