This Poem is Second part of My first post
"कारण ती आलीच नाही".
http://marathikavita.co.in/index.php/topic,6563.0.htmlमी नाही येऊ शकले...
- रुपेश नाईक
उचललेली पावले जागीच थिजली
हाक देखील मग हवेत विरली
अखेरचे आता त्राण ही सरले
आणि मग मी नाही येऊ शकले
भेटीच्या ओढीची ओढाताण झाली
देव देवतांना देखील गार्हाण धरली
नियतीच्या खेळत मात्र मी सपशेल हरले
आणि मग मी नाही येऊ शकले
आपल्या प्रेमाचा प्रश्न गहन फार झाला
आप्तांचाच सोस मग सहन नाही झाला
असह्यापारी अंथरूणच मी धरले
आणि मग मी नाही येऊ शकले
आपला प्रवास स्मृती पटलावर चालू होता
तुझा पहिला गुलाब जवळच विसावला होता
गुलाबाचा रंग फिका वाटत होता
thermometer देखील उच्चांक गाठत होता
तरीही वाटत होते तुझ्या समीप यावे
पुन्हा एकदा तुला डोळे भरून पाहावे
उगाचच रुसावे अन भांडावे तुझ्याशी
मनातील गुज सारे मांडावे तुझ्याशी
----To Be Continued