Author Topic: एक भरकटलेली कविता ...Pranali Mohite  (Read 1115 times)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
एक भरकटलेली कविता जी अपुरी हि आहे आणि पूर्ण हि करावीशी वाटत नाही ......

 
असे चालले होते जीवन
जणू जगण्यास नव्हते कारण
दिवस येई भुरकन जाई
पुन्हा रात्री मग उद्याची घाई
 
दिस सरले महिने गेले
काही क्षण आयुष्य हे उरले
तरी जगण्याची नव्हती खंत
जरी जिंदगी चालली हि संत
 
अन अचानक एके दिवशी
तुझी आठवण खुदकन हसली
का सखे मज तू विसरली?
इतक्या रात्री एकटीच रडली...
 
काही दिवसांचा आपला हा विरह
अर्थ याचा एकजीव दोन देह
तरी...
व्यसन लावले एकांत स्वताशी
आठवण हि नाही माझी उश्याशी
 
रडून राणीचे डोळे हि सुकले
न रहावले मग यावे लागले
असली कसली तुझी हि प्रीती?
मिलनासाठी मरणाशी मैत्री...
 
बघशील एकदा हसून जगाशी
माझी छबी तिथे तू पाहशी
आपल्या प्रेमाची अनोखी कहाणी
राज्यावाचून हि रोमांचित राणी
आदर्श हा आपला त्या युवतीशी
लग्नावीणा जी सौभाग्यकांक्षिणी............ प्रणाली

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
Re: एक भरकटलेली कविता ...Pranali Mohite
« Reply #1 on: February 07, 2013, 11:35:53 AM »
surekh....

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: एक भरकटलेली कविता ...Pranali Mohite
« Reply #2 on: February 07, 2013, 03:23:03 PM »
khup chan

Offline Preetiii

 • Newbie
 • *
 • Posts: 44
Re: एक भरकटलेली कविता ...Pranali Mohite
« Reply #3 on: February 08, 2013, 09:47:54 AM »
Ekdam Sundar