Author Topic: आज़ तुला मला उगाच ...SORRY ..म्हणायचंय्... :-(  (Read 1675 times)

Offline Prem Mandale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
:-(  SORRY.. :-(

तू चुकली नाहिस आणि मीही चुकलो नाही
गेल्या काही दिवसात आपण उगाच भांडलो नाही
तरी मला आज तुला SORRY म्हणाय्चंय्

मला वज़ा करत करत ....तुला गुणाय्चंय् ...
ते दिशाहीन दिवस आठवतात का तुला ?
दिवस आणिक रात्र यांच्यात फरक नसायचा
ते रस्ते..ती वळणं....अजून तशीच आहेत

चंद्र आणिक सूर्य जिथुन ...एक दिसायचा
तुझं स्वप्न माझ्यात होतं माझं स्वप्न तुझ्यात
दोन्ही स्वप्नांमधून पक्षी ...एक उडायचा...

निळागर्द सागर बघुन तुझ्या डोळ्यांमधला
किनार्यावर उभ्या उभ्या कुणी बुडायचा...

दिवस रात्र चंद्र सुर्य ..तो स्वप्न सागर ..
ते सगळं पुरलं गेलं ...पुन्हा खणायचंय्..
आज़ तुला मला उगाच ..SORRY म्हणायचंय्..

कुणास ठाउक काय घडलं ..मधल्या काळामध्ये ..
खूप खूप बोलत असून ..मुकं मुकं वाटलं
तुझ्या चेहेर्यामध्ये माझा चेहेरा होता तरी...

दोघांच्याही आरशांवरती ..धुकं धुकं दाटलं ..
भिंती भक्कम होत्या आणि छप्पर घट्टं तरी
एकमेकांवरलं आभाळ ..हळू हळू फाटलं..

हात होते हातात ..आणि सोबत होतो तरी
दोघांनाही एकांतानं ....कसं गाफिल गाठलं ?
त्या एकांतांना आज़ ....गल्बल्यात विणायचंय्..
आज़ तुला मला उगाच ...SORRY ..म्हणायचंय्...

 :-( .sorry ..SORRY . :-(

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….

Arvind .kute

 • Guest

Offline Prem Mandale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
Thanku Shital ji