Author Topic: निरोपाच बोलण...  (Read 1370 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
निरोपाच बोलण...
« on: November 21, 2012, 06:35:29 PM »
निरोपाच बोलण जरा लांबव..
थोड़ा श्वास घे ..
उछवासही टाक उगाच ..
अन बाकीच डोळयातुनच संपव.. !

विषय वाढवायचाच म्हणुन आठव ....
तो पुनवेचा चंद्र,
अमावस्येचा अंधार
अन् बाकीच आठवणीतच संपव ...!

तसा काही विशेष आठवु नको...
सोबत पाहिलेली स्वप्न ,
अन् मनोराज्य...
तुटणारां ताराही पुन्हा दाखवू नको..!

जमलंच तर राहू दे तसाच...
अंगावरचा शहारा,
अन् स्तब्ध राहिलेला वारा..
डोळयातलं पाणी वाहू दे उगाच...!

विसरून जा ती पाउलवाट..
तो भरतिचा चंद्र,
आणि ओहोटीची ती लाट
वाळुंतली नावे ही पुसून टाक...!

आता इतकं करतेच आहेस तर..
पुनर्जन्माचं वचन देऊन टाक,
अजुन थोडं खोटं बोलून टाक..
'त्या' जन्मी तरी..., "पुन्हा भेटू " म्हणून टाक...!

By: विनायक
(Vinayak Dilip Ujalambe)Marathi Kavita : मराठी कविता