Author Topic: ध्यानी मनीं नसतां ...  (Read 766 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
ध्यानी मनीं नसतां ...
« on: December 13, 2012, 11:42:36 AM »
ध्यानी मनीं नसतां ...

ध्यानी मनीं नसतां
स्मृतिंचा अंकूर उगवतो असा
चिखलांतून चालताना
पायी कांटा रुतावा जसा ।
दूरून सारंगीचा  छेडलेला
मंजूळ जसा सूर यावा
पर्वतांवरून  घसरून
वाळवंटी निर्झर जांवा ।
मौन धरलेल्या अधरांवर
प्रीतिचा शब्द यावा
शून्य उदास आकाशीं
सायंतारा चमकावा ।
खडकाळ रानामध्ये
एकच गुलाब उगवावा
पहाटेच्या शांत समयी
मृदुंगाचा बोल यावा ।
मंद गार झुळके संगे
संगीताचा सूर यावा
पहाटेस भजनाचा
पवित्र तो बोल यावा ।
एकटा जीव हा विरहांत
उदास हा जगावा 
सूर्य किरणांनी धरेवर
कशिदा तो काढावा ।
हिरव्या हिरव्या पानांवर
दवबिंदूनें शब्द लिहावा
खवळलेल्या सागरांतून
एक मोती वर यावा ।
विरहांच्या बाणाने
हृदयाचा वेध घ्यावा
जीवनांत ह्या एकाकी
मृत्युचा भास व्हावा ।। रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_7.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: ध्यानी मनीं नसतां ...
« Reply #1 on: December 13, 2012, 11:44:53 AM »
avadali kavita.........
 :) :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: ध्यानी मनीं नसतां ...
« Reply #2 on: December 13, 2012, 12:08:21 PM »
मस्त आहे. खरच खुप छान!!!!