Author Topic: एक हृदयस्पर्शी पाखरू..  (Read 1198 times)

Offline Sandy_Love_Sau

  • Newbie
  • *
  • Posts: 7
एक हृदयस्पर्शी पाखरू..
« on: December 13, 2012, 12:48:01 PM »
प्रेम काय असते? कधी होते? कसे होते?
काहीच कळत नव्हत
जेव्हा तु आयुष्यात आलीस...

उडत्या पाखराला सुगंधाने मोहून गेलीस..
कळत नकळत प्रेमच नातं मनाशी जोडून गेलीस..
कधी न पुसतां यावं असं नाव मनात लिहून गेलीस..
वय होत मन जुळायच..लळा लाऊन गेलीस..

ठेच लागतां हृदयी..पाठ फिरवून गेलीस..
प्रेम..मन..आठवणी..भावना..
सारं काही ओरबाडून गेलीस..

तु गेल्याच दुख मोठे नव्हत..कारण...
जाता जाता अखेर..
प्रेम काय असत? कस होत?..
..आणि कस करावं?
हे तू शिकवून गेलीस..


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: एक हृदयस्पर्शी पाखरू..
« Reply #1 on: December 13, 2012, 12:48:54 PM »
chan kavita