Author Topic: तु आता कुठेही दिसत नाहीस...  (Read 3813 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
तुला आठवते...??
ती आपली पहिली भेट??
आणि मग तुझे ते लाजून हसणे
अजूनही आठवते मला
हळूच माझ्या मनाचे तुझ्यामध्ये फसणे
त्यातला प्रत्येक क्षण अन क्षण
मला अजूनही विसरवत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!१!!

तुला आठवते...??
त्या रात्रीचे माझे बालिश प्रश्न??
अन तु त्यांना दिलेली नादान उत्तरे
पण आता तु नसतांना
माझ्या मनीचा एकही प्रश्न सुटता सुटत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!२!!

तुला आठवते...??
त्या रात्री बरसणारा पाऊस??
तु खुप दूर तरीही तुला ऐकण्यासाठी
माझी चाललेली धडपड
सतत तुटणारे Network तरीही
वाढलेली हृदयाची धडधड
तेव्हापासूनची धडधड काही केल्या थांबतच नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!३!!

तुला आठवते...??
मग आपण जागून काढलेली ती पूर्ण रात्र??
तु आणि मी इतक्या दूर असूनही
एकमेकांना भेटण्यासाठी आतुरलेली आपली मने
एकमेकांची लागलेली ओढ आता
हवीतशी वाटत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!४!!

तुला आठवते...??
त्या रात्रीनंतर उजाडलेली
ती प्रफुल्लीत पाहाट??
दोघांच्याही श्वासांनी भरलेला
हवेचा थंडगार सुवास
तो सुवास तर आहे पण
कुठेही त्यात तुझा गंधहि येत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!५!!

तुला आठवते...??
तु मला ऐकाविलेली तुझी ती कविता??
आणि मग ती ऐकता ऐकता
माझ्या नेत्रांतून वाहिलेली सरिता
त्या दिवसापासून माझ्या नेत्रांतील अश्रू
अजूनही सुकत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!६!! 

तुला आठवते...??
तुझ्या कवितेमुळे मला स्मरलेले
ते एक काव्य??
त्यात होते फक्त तुझे अन तुझेच
अमर्याद अस्तित्व
ते अस्तित्व आता मला कुठेही जाणवत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!७!!

तुला आठवते...??
कविता कशी झाली हे विचारण्यासाठी
मी पाठवलेला mail??
आणि तुझे काहीच उत्तर न आल्याने
माझ्या मनाची झालेली घालमेल
अजूनही ती घालमेल काही केल्या संपत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!८!!

तुला आठवते...??
तुझे ते भारावलेले रोम अन रोम??
तुझ्यावर कोणीतरी कविता लिहिली
म्हणून उचम्बळलेले तुझे प्रेम
ते प्रेम आता कशातूनच वाहात नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!९!!

तुला आठवते...??
त्यानंतर आपले रुजलेले खोल प्रेम??
कायम प्रेम करण्याचे कधीही न दुरावण्याचे   
तु मला दिलेले पहिले वचन
वचन राहीले दूर आता तुझा एक
शब्दही कधी कानी पडत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!१०!!

तुला आठवते...??
मी तुझ्याशी share केलेली
अनेक सुख आणि दुखे??
सुख तर जाऊदे आता दुखातून
क्षणभरही सुटका होत नाही
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...!!११!!

तुला आठवते...??
हो तुला अजूनही सर्वच आठवते!!
पण मुद्दामूनच तु तसे दाखवीत नाहीस
माझ्याबरोबर घालवलेले ते क्षण
तुला अजूनही विसरवत नाहीत
पण मला मात्र तुझ्यातली तु आता
कुठेही दिसत नाहीस...
कुठेही दिसत नाहीस...!!१२!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.
« Last Edit: January 10, 2013, 03:10:53 AM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रसाद पासे

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #1 on: January 02, 2013, 02:42:47 PM »
Mast jamli ahe...agadi dolyasamor prasang ubhe rahatat...

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #2 on: January 02, 2013, 03:07:15 PM »
mast ..... :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #3 on: January 03, 2013, 12:23:51 AM »
Prasad ji, Ganesh ji...
... khup abhar agadi manapasun.

Jayesh Patil

 • Guest
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #4 on: January 03, 2013, 12:29:28 AM »
Prajunkush ji khup chan kavita ahe. Tumhi vishwas theva kadhina kadhi ti nakkich tumhala bhetel. Baas kavita karane sodu nka. 

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #5 on: January 03, 2013, 02:47:19 PM »
तुझ्यातली तु आता कुठेही दिसत नाहीस...हे चांगलच १२ वेळा मनावर ठसल .पण का ते नाही कळल . ;)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #6 on: January 03, 2013, 03:50:12 PM »
Vikrant ji tyche ase ahe ki varil goshtin paiki kahi goshti ajunahi ghadat ahet pan tyat to olava, prem ata disat nahi mhanun ''तुझ्यातली तु ''आता'' कुठेही दिसत नाहीस...  Ithe ''atta'' mhanaje vartaman kalabaddal lihile ahe. Mhanaje tu tyaveli jashi hotis ata tashi nahis.

Thanks..

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #7 on: January 14, 2013, 04:06:32 PM »
as apratim kavita tuch karu shaktos
khup chan rachaliy
 :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #8 on: January 16, 2013, 06:02:01 PM »
Prachi ji...
... Khup abhar agadi manapasun. Pan tumchya sarkhya rasikanchi sath asalyashivay kavitela rangat yet nahi.
Dhanyavad...

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
Re: तु आता कुठेही दिसत नाहीस...
« Reply #9 on: January 17, 2013, 03:29:32 AM »
Prasad Ji ani Prajankush ji..khup chan lihila ahe (y)