Author Topic: संध्याकाळ  (Read 1449 times)

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
संध्याकाळ
« on: January 02, 2013, 03:03:58 PM »
तुझी वाट बघण्यात संध्याकाळ सरुन जाते
रोज माझ्या मनाचे गाणे हवेत विरुन जाते

एकटेपणाला सोबत घेऊन ही सांज रोज मला भेटते
तुलाही येत असेल माझी आठवण उगाच तेव्हा वाटते

कधी आठवुन एखादा क्षण मन उगाच कासावीस होते
तु नसतांना देखील मन तुझेच होऊन राहते

रोज नवी संध्याकाळ तुझी नवी आठवण देते
येशील तु कधीतरी मन उगाच ग्वाही देते

सारे काही आलबेल असते एक मला सोडुन
मन मात्र वेडं होते तुझी आठवण काढुन

सगळा हा खेळ चालतो फक्त एक तुझ्यासाठी
एकांत हा करत राहतो मनाला सोबत प्रेमापोटी

दिवेलागणीला मन एकट्च घरी परत येते
तुझ्या आठवणींची साखळी पुन्हा सुरु होते


गणेश शिवदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: संध्याकाळ
« Reply #1 on: January 02, 2013, 03:33:32 PM »
Apratim...

एकटेपणाला सोबत घेऊन ही सांज रोज मला भेटते
तुलाही येत असेल माझी आठवण उगाच तेव्हा वाटते

सगळा हा खेळ चालतो फक्त ''एक'' तुझ्यासाठी
एकांत हा करत राहतो मनाला सोबत प्रेमापोटी
दिवेलागणीला मन एकट्च घरी परत येते
तुझ्या आठवणींची साखळी पुन्हा सुरु होते...Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: संध्याकाळ
« Reply #2 on: January 02, 2013, 03:55:22 PM »
दिवेलागणीला मन एकट्च घरी परत येते
तुझ्या आठवणींची साखळी पुन्हा सुरु होते

 
chan

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: संध्याकाळ
« Reply #3 on: January 02, 2013, 04:13:47 PM »
THANKS PRAJANKUSH,KEDARJI.THANKS A LOT  :)

Offline Preetiii

 • Newbie
 • *
 • Posts: 44
Re: संध्याकाळ
« Reply #4 on: January 02, 2013, 04:33:25 PM »
Ekdam Chhan

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: संध्याकाळ
« Reply #5 on: January 03, 2013, 10:34:47 AM »
Thanks preetii.... :)