Author Topic: उन्हं थोडी वाढली.......  (Read 701 times)

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
उन्हं थोडी वाढली.......
« on: January 02, 2013, 03:25:50 PM »
उन्हं थोडी वाढली आणी सावल्या पांगतच गेल्या
या मोसमांनी मला वावटळी फार दिल्या

माझ्या अंगणाला सोडुन धारा चोहिकडे बरसल्या
धुंद त्या पावसात माझ्या वाटा वाहुन गेल्या

वसंतातही शिशीराने सावल्या दुर नेल्या
माथ्यावर उन्हातल्या काही छटा राहुन गेल्या

ऋतु बदलावा म्हणुन तिन्ही सांजा जागविल्या
कुठ्ल्याशा कातरवेळी दिशा अंधारुन आल्या

रात्रीही जेव्हा नभी चांद्ण्या जमा झाल्या
काळ्याकुट्ट अंधारात सगळ्या झाकोळल्या गेल्या

पहाटेच्या कळ्या कधी फुल ना झाल्या
माझ्या अंगणात सगळ्या कोमजुन गेल्या

उन्हं थोडी वाढ्ली आणी सावल्या पांगतच गेल्या
या मोसमांनी मला वावटळी फार दिल्या


गणेश शिवदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: उन्हं थोडी वाढली.......
« Reply #1 on: January 02, 2013, 03:54:16 PM »
kyaa baat....

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: उन्हं थोडी वाढली.......
« Reply #2 on: January 02, 2013, 04:10:17 PM »
Thanks ....KEDARJI :)