Author Topic: ते फुल  (Read 957 times)

Offline GANESH911

  • Jr. Member
  • **
  • Posts: 124
  • Gender: Male
  • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
ते फुल
« on: January 02, 2013, 04:36:06 PM »
ते फुल जपलयं प्राणपणाने
जे राहुन गेले तुला दयायचे
आणी शब्द ही राहीले ओठी
कधी होते जे तुज सांगायचे

त्या एका दिवसाची वाट बघत
मी सांभाळले सर्व बोलायचे
सांगेल कधी तुजलाही माझे
गुपीत डोळयांच्या भाषेचे

पण ना झाली कधी ही किमया
दिवस फक्त सरत गेले
ना देउ शकलो हिशेब तुजला
जागवलेल्या रात्रींचे

सोनेरी ते दिवस सारे,
मंतरलेले आठवांचे
आणी बोल ही राहीले तसेच सारे
भावविभोर कवितांचे

तुजला ही ते कधी ना कळले
प्रेमगीत या मनाचे
आणी शब्द ही राहिले ओठी
कधी होते जे तुज सांगायचे.


गणेश शिवदे

Marathi Kavita : मराठी कविता