===================================================================================================
वैवाहिक जीवनात बायकाच नवरया पेक्षा विलक्षण चतुर
डावपेच आखून नवरयास चेकमेट देण्यास आतुर
तिच्या सारखी कलाकार भूतलावर सापड़नार नाही
नवरा मात्र अहंपनाच्या डबक्यातुन बाहेर पडत नाही
बायकांचे प्रहार हिरयाला पैलू पाडन्या सारखे असतात
म्हणुनच सगळे नवरे त्यांच्या मुठीत जाउन बसतात
काही नर सोडले तर इतरांची अवस्था बघवत नाही
त्यांची कथा मांडल्या शिवाय मलापण राहवत नाही
लढन्याची ताकत संपली की नवरा ब्याचलर होतो
एकटाच बागेत नाहीतर एखाद्या देवळात जातो
तिथे सुन्दर चेहरे पाहून अहाहा खुपच छान म्हणतो
अशीच बायको हवी होती अस मनातच पुटपुटतो
हिचा नवरा किती भाग्यवान अशा कल्पनेत रमतो
माझी काय चुक असा शब्द अंतकरनातुन निघतो
खर म्हणजे त्याचा तो गोड गैरसमज असतो
तिचा नवरा घरी कुकरच्या शिट्या मोजत असतो
सुरुवातीला काही मदत केलितर 'राहुद्याहो' अस म्हणत असते
आता मात्र तिला काही बोलायचीच परमिशन नसते
तेव्हा ' दुधावर लक्ष ठेवा मी दळण घेवून येते '
आता ' दळण घेवूनया तोपर्यंत भाजी फोडनीला टाकते '
तेव्हा ' आघोंळीला जातेय तिन शिट्यानंतर कुकर बंद करा '
आता '' धुन धूवुन घेते जरा कुकर लावायाच काम करा '
पहिल्या सारखे नाही राहिलात अस काही बडबडते
एवढाच काय मार्गशिर्शाताले गुरुवार करा म्हणते
नवरा मग एकदा फॅमिली डॉक्टर कड़े जातो
डॉक्टरसाहेब पहा जरा बी पि चा त्रास होतो
सल्ल्यानुसार लगेच मग बी पि चेक करायच ठरत
अहो बी पि म्हणजे बायकोच प्रेशर अस मला म्हणायच होत
नवरयांची पण आता आहे घरकाम करायची बारी
स्त्रीपुरुष समानता आली आहे आता आपल्या दारी
अहो संसाराचा गाडा थोड्या कुरबुरिन चालतच असतो
पतीला काही झाल तर तिच्याच काळजाचा ठोका चुकतो
===================================================================================================
===================================================================================================