Author Topic: कधीच नाही पहाणार...  (Read 1778 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
कधीच नाही पहाणार...
« on: January 18, 2013, 11:52:53 PM »
कसे सांगू तुला
माझ्या मनीची व्यथा
तु नसताना झालीय
माझी काय दशा...!!१!!

कसे सांगू तुला
माझे चुकले नव्हते
नियती पण कधी कधी
सर्वांनाच झुकाविते...!!२!!

कसे सांगू तुला
ती परीक्षाच असेल
कुणाचा किती विश्वास
देव पाहत नसेल??...!!३!!

कसे सांगू तुला
प्रेम मिळविणे कठीण
मिळालेच तर टिकविणे
त्याहून हि कठीण...!!४!!

कसे सांगू तुला
तु किती अनमोल
हजारो जन्मात माझ्या
चुकणार नाहीत मोल...!!५!!

कसे सांगू तुला
मन किती उदास
तु नाहीस तरी
तुलाच पाहण्याची आस...!!६!!

कसे सांगू तुला
हृदय किती रडतेय
तुझ्या हृदयाला विचार
त्याला सर्व कळतेय...!!७!!

कसे सांगू तुला
श्वास आता थांबतोय
हळू हळू आता
अखेरचा होऊ पाहतोय...!!८!!

कसे सांगू तुला
जीव आता जातोय
क्षणभराचा विलंब
हा देह सोडू पाहतोय...!!९!!

कसे सांगू तुला
मी मी नाही राहणार
तुझ्यावाचून माझे
अस्तित्वच नाही उरणार...!!१०!!

कसे सांगू तुला
काहीतरी बोल आत
नाहीतर तु मला
कधीच नाही पहाणार.
कधीच नाही पहाणार...!!११!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.
« Last Edit: January 23, 2013, 10:52:42 AM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कधीच नाही पहाणार...
« Reply #1 on: January 19, 2013, 04:31:11 PM »
chaan

Offline देवेंद्र

 • Jr. Member
 • **
 • Posts: 90
Re: कधीच नाही पहाणार...
« Reply #2 on: January 20, 2013, 10:24:38 AM »
shabd chaan ahet mitra... reflects the pain you have one through.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कधीच नाही पहाणार...
« Reply #3 on: January 21, 2013, 05:08:27 PM »
style avadali....dhrupad pahilya olit chan vatal

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: कधीच नाही पहाणार...
« Reply #4 on: January 22, 2013, 07:01:05 PM »
apratim kavita..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: कधीच नाही पहाणार...
« Reply #5 on: January 23, 2013, 10:50:25 AM »
Prashant ji, Devendra ji, Shrikant ji ani Kedar sir...
... Khup abhar agadi manapasun. Kedar sir hya kavitechi khasiyat mhanaje pratyek kadve 12 shabdani banale ahe.
Dhanyavad...

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
Re: कधीच नाही पहाणार...
« Reply #6 on: January 23, 2013, 11:39:26 AM »
superb..mast ahe..touchy

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: कधीच नाही पहाणार...
« Reply #7 on: January 23, 2013, 12:46:27 PM »
Amey ji...
... Khup abhar agadi manapasun.