Author Topic: तिचे अल्लड हसणे कधी कधी आठवते  (Read 1053 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तिचे अल्लड हसणे कधी कधी आठवते
अन नकळत डोळे पाणावतात
तेव्हा मग चांदण्याही काहीशा पुसट दिसतात
त्या पाण्यातले प्रतिबिंब तिच्याच हसण्याचे असते
अन त्या प्रतिबिंबातली ती मात्र कुठेच नसते
तिची ती नजर मला शोधणारी अजून हि मला गर्दीत भासते
पण तो भास आहे हे कळते तेव्हा मात्र ती गर्दी जणू खायला उठते
ती असताना भर उन्हात पावसात भिजायचा अनुभव घेतला
अन आता मुसळधार पाऊसही रखरखीत वाटतोय .....
का कुणास ठाऊक मनामध्ये माझ्या आज तिच्याच आठवणींचा गडद मेघ दाटतोय.........
त्या बेभान वा-यात तिच्या स्पर्शाचा सुगंध दरवळतोय
अन त्या पावसाचा एक थेंब तिचे रूप घेऊन माझ्या गालावरून ओघळतोय...................