Author Topic: अव्यक्त..  (Read 1043 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
अव्यक्त..
« on: February 22, 2013, 09:55:17 AM »
तुझ्या जवळून जाणाऱ्या हजार वाटा..
आणि त्या वाटांवरती सतत काहीबाही वाटत राहिलेला मी
मनातलं रॉकेट उंच आकाशात उडवायचं सोडून
पानभर त्याची गणितंच सोडवत बसलेला मी
घनदाट केसांच्या गाभाऱ्यात ऊर भरून श्वास घ्यायचं सोडून
तुझ्या केवळ दिसण्याने श्वास कोंडत आलेला मी
तुझ्या डोळ्यातल्या निखळ धबधब्यात चिंब भिजायचं सोडून
तुझ्यापासूनच नजरा वाचवत आलेला मी
तुझ्याशी सलगी करणाऱ्यांवर चोरटा पहारा देणारा
आणि सलगीसाठीच्या तुझ्या पावलांचीच निरर्थक वाट पाहणारा मी
तू नसलीस कि तुझ्या चाहुलींची वाट पाहणारा
आणि तू असलीस तरी एकटाच कुढत बसणारा.. वेडा मी
असाच आहे मी..

- रोहित
« Last Edit: February 22, 2013, 09:56:19 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: अव्यक्त..
« Reply #1 on: March 02, 2013, 07:26:50 PM »
Rohitji masta ekadam...