Author Topic: तिला शोधता शोधता असा हरवून गेलो  (Read 1461 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तिला शोधता शोधता असा हरवून गेलो
कि परत येण्याची वाट मिळेना
येताना तिच्या पाउलखुणा सोबत होत्या
पण परतीच्या पाउलखुणा मात्र फक्त माझ्याच होत्या
माघारी येण्यास मन तयार होईना
कसाबसा त्याला समजावून परत निघालो
तर आठवणी तिथेच राहिल्या
मुकेपणाने रडताना मी त्या पहिल्या
आठवणीचे डोळे पुसताना आसवे म्हणाली
जेव्हा तू रडतोस तेव्हा ती असायची आम्हाला झेलायला
पण आज तू झेलतोयस आम्हाला
ओझं तर नाही न वाटत ओंजळीत...?
काही न बोलता मी निघालो त्या सर्वाना घेऊन
सोबत होता तो रिमझिम पाउस अन ते सोनसळी उन
झरझर पावले टाकत माघारी फिरलो
पण उद्या मन मला याच वाटेवर घेऊन येणार होतं
तिथे येऊन ते माझ्यासोबत पुन्हा तिची वाट बघणार होतं .....
तिथे येऊन ते माझ्यासोबत पुन्हा तिची वाट बघणार होतं .....
                                                   ---- पाउसवेडा

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...