Author Topic: अगदी माझ्यासारखं.......  (Read 1065 times)

Offline Anan.mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Male
 • तुझ विन अनंता !!
अगदी माझ्यासारखं.......
« on: March 04, 2013, 01:26:07 PM »
अगदी माझ्यासारखं....... :( :( :(

ते बघ, ते  माळरान ,
एकट , सताड,
उदास आणि ओसाड ,
अगदी माझ्यासारखं.......

होता एके वेळी  इथे  प्रेमाचा गारवा,
चालत होता पान-फुल अन पक्ष्याचा मारवा,

होती इथे एक  अनोखी पहाट,
स्वच्छंदी मी अन तो चिवचिवाट,

पण तुझे ते शब्द झाले गोफण,
आणि सगळे निस्तब्ध,

सर्व हरवलंय, सर्व हरवलंय  ते  फक्त एका दवबिंदूसारखं ,
ते बघ, ते  माळरान ,
एकट , सताड,
उदास आणि ओसाड ,
अगदी माझ्यासारखं.......

कोरडलंय आभाळ  सारं,
भेराड्लीय धरणी,

सगळ कस निखळ आणि सुंदर होत ,
का व्हावी तुझ्याकडून करणी,

सोसतोय असहनीय  कठोरता उन्हाची ,
अन त्या घमासान  निर्दयी वाऱ्याची ,

बघ  ना ;;;;;;; बघ ना , काळ  कसा सरतो आहे,
तुझ्यासाठी चातक हा ;  कधीचा  झुरतो आहे ,

बिथरलीत  सर्व स्वप्न  ;;;;
बिथरलीत  सर्व स्वप्न एखाद्या माणिकमोत्या  सारखं,,
ते बघ, ते  माळरान ,एकट , सताड,
उदास आणि ओसाड ,अगदी माझ्यासारखं.......             
...................आनन म्हात्रे   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: अगदी माझ्यासारखं.......
« Reply #1 on: March 05, 2013, 02:55:03 PM »
Anan ji khup chan kavita ahe. Lagali manala..

Offline Anan.mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Male
 • तुझ विन अनंता !!
Re: अगदी माझ्यासारखं.......
« Reply #2 on: March 05, 2013, 03:36:09 PM »
धन्यवाद प्रजुन्कुश !!!