Author Topic: विराणी  (Read 932 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
विराणी
« on: March 15, 2013, 11:44:39 PM »
भिजलेल्या फांदीवर
पक्षी एकटा भिजत
भिजलेल्या सुरामध्ये
होता उगाच झुरत

तेच एक गाणे त्याचे
किती किती ऐकायचे
मान्य प्रेम भंगलय
किती किती रडायचे 

माझे हे बोल त्याला
मुळीच पटले नाही
दु:ख जडले प्रेम ते   
कधी कमी झाले नाही

खिडकी बंद केली मी
गडद पडदे खाली
तरीही त्याची विराणी
घुसतच आत आली

ओल्या गर्द अंधारी त्या
पिंजून पिंजून गेलो
विरघळुनी सुरात   
मग पक्षी तोच झालो 

 विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 01:20:30 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता

विराणी
« on: March 15, 2013, 11:44:39 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: विराणी
« Reply #1 on: March 16, 2013, 11:32:10 AM »

मित्रा
खूप छान!
मला दोन ओळी सुचल्या!
बघ तुला आवडतात का?

भिजलेल्या फांदीवर,
थिजलेल्या डोळ्यांनी,
गर्द ओल्या अंधारी,
बघ तू
पर्न एक अंकुरती!

मिलिंद कुंभारे

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
Re: विराणी
« Reply #2 on: March 16, 2013, 12:24:38 PM »
धन्यवाद मिलिंद ,तुमच्या ओळीत गेयता आहे.
अष्टकारीत जर प्रत्येक ओळीत ८ शब्द आणि २ रया व ४ थ्या ओळीत यमक घेतले कि लय आपोआप येते .कविता पूर्ण करा,वाचायला आवडेल

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: विराणी
« Reply #3 on: March 16, 2013, 01:28:10 PM »

विक्रांतजी
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
वाटतं मराठीचा तुमचा दांडगा अभ्यास असावा!
गेयता म्हणजे काय असतं मला कळले नाही!
सविस्तर समजवाल तर बरे वाटेल!

तसच आत्ताच मी एक कविता पोस्त केली!
त्यात काही त्रुटी असतील तर सुचवा!
कविता खाली paste करतो!

प्रवास

सखा तुझा
अधांतरीच तुला
सोडून गेला!
वाटलं प्रवास आता
संपला तुझा!

पण न खचता
खेळलीस तू;
आयुष्याची
एक झुंजार खेळी!

अशातच
प्रवास तुझा कधी थांबला;
तुला कधी कळलेच नाही!

आता शब्द तुझी गोठलीत;
आसवहि थिजलित!
पण नजर तुझी
सदैव भिरभिरती!
कुणास ठाऊक?
कुणासाठी?
कशासाठी?

घरट्यातली  पाखरें;
केंव्हाच गगनभैर झाली!;
कधीही न परतण्यासाठी!
पण तरीही;
नजर तुझी
सदैव भिरभिरती!
कुणास ठाऊक?
कुणासाठी?
कशासाठी?

आई सांग  मज
आजच्या दिवशी;
वाहू कसा मी;
तुज श्रद्धांजली!
आठवणींचा पाऊस
पापण्यांपलीकडेच आटवू;
कि ढसा - ढसा
रडूं मी!

मिलिंद कुंभारेOffline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
Re: विराणी
« Reply #4 on: March 17, 2013, 12:14:18 PM »
मिलिंद,माझा अभ्यास दांडगा नाही.पण मराठीवर प्रेम दांडगे आहे .गेयता म्हणजे माझा निकष सहज गुणगुणता यावे असे .जशी लय बालकवीच्या  फुलराणी  ,श्रावणमासी , आणि तांबे, आरती प्रभू यांच्या  कवितेत आहे .
तुमची कवितेत  चुका दाखवण्या ऐवढा मोठा कवी मी नाही .कारण मीच शिकतो आहे .पण मित्र म्हणून बोलू शकतो .गंभीर विषयाला मुक्त  छंद जास्त योग्य वाटतो .आणि तो तुम्ही  योग्यपणे वापरला आहे .कवितेचे नाव आई असते तर कवितेने लगेच पकड घेतली असती .

Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: विराणी
« Reply #5 on: March 17, 2013, 07:48:55 PM »
आठवणिने तुझ्याच राणि, 
नयनि माझ्या येते पाणि,   
नसतो मि कोणाचाहि त्या क्षणि,   
किंवा नसते माझे कोणि.


तुझ्या प्रेमाचि सांगु महति,   
ऍकाया जमले जन भोवति, 
दु:खामध्ये कोणि न सहभागि,   
विरह माझा मिच भोगि
          क्रुष्णकमार प्रधान

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
Re: विराणी
« Reply #6 on: March 27, 2013, 10:35:19 PM »
thanks krishnakumar , i got it.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):