Author Topic: आठवण त्या एकांताची  (Read 1129 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
आठवण त्या एकांताची
« on: March 24, 2013, 11:50:18 PM »


आठवणीने भारलेल आभाळ
डोळ्यात माझ्या दिसत होत
वेदनेच्या या पावसात
अश्रू पापणीआड लपवत होत

होते रुसवे फुगवे
सारे मनात ते राखत होत
जखमा मनाच्या लपवत
जगापुढे ते हसत होत

एकांतात मात्र वेड
तिच्या आठवणीना पारखत होत
नकळत अश्रू ढाळून
पुन्हा तिच्यातच वेड रमत होत

प्रत्येक क्षण ओळखीचे
ते अश्रूत निसटत होत
आठवणीच्या तिजोरीतील
तिच्या जागेला ते बोलवत होत

आता काहीच नव्हत त्याच्या जवळ
फक्त आठवणीत ते जगत होत
परतून येशील पुन्हा म्हणून
आज हि टक लाऊन पाहत होत

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ganesh Naidu

  • Newbie
  • *
  • Posts: 40
  • Gender: Male
Re: आठवण त्या एकांताची
« Reply #1 on: March 25, 2013, 01:01:22 PM »
phar chan sunil :)