Author Topic: घाव माझ्या मनाचे ........  (Read 1130 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
घाव माझ्या मनाचे ........
« on: March 26, 2013, 11:01:50 PM »भिजवुन टाक रात सारी
अश्रुनी माझ्या नयना
उद्या पहाट होईल पुन्हा
मनाच्या सार्या वेदनांना

सोबतीला कोणीच नसेल माझ्या
हि वाट असेल वैर्याची
आठवणी तुझ्या राखून मनाशी
हा भोग कोणता माझ्या जीवनाशी

उष्ण ते तप्त ऊन सारे
अन जख्म मनाची ओली
चोलीन मीठ जाख्मेस
माझाच तू घात करी

हाथ कुणाचा धरू
येथे नाही विश्वास कोणाचा
अबोल ते मन मानासोबत
एकांतच आहे सोबतीला

सावलीच फक्त आपुली
सदा साथ देई मजला
काळोखास भेटून बोले
आता सांभाळ रे तुझ्या लेकरा

सोसून सारे काही
पुन्हा भेट होई काळोखाला
पुन्हा तेच अश्रू
अन वेदना होई मनाला

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: घाव माझ्या मनाचे ........
« Reply #1 on: March 28, 2013, 12:15:28 PM »
nice...