Author Topic: मनामधल्या भावनांची  (Read 1118 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
मनामधल्या भावनांची
« on: April 07, 2013, 06:08:49 PM »
मी बसलो निमूटपणे एकटा
तेव्हा अलगत पापणी ओली झाली
आठवणीचे गाठोडे
पुन्हा उलघडायला सुरवात झाली

मनामधल्या भावनांची
पुन्हा पहाट होऊ लागली
हृदयाची स्पंदने हि
हळू हळू खुलू लागली

अश्रूने पुन्हा
जखम ओली होऊ लागली
विसरलेल्या घावांची
पुन्हा खपली निघू लागली

हृदयाच्या कप्यात
आठवण तुझी डोकाऊन पाहू लागली
काही कडू-गोड त्या क्षणात
पुन्हा खेचून मला नेऊ लागली

मावळत्याला रोजच
भेटची अशा मनात दाटू लागली
भेटीची ओळख म्हणून
स्वप्नाची रात्र जगू लागली

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मनामधल्या भावनांची
« Reply #1 on: April 09, 2013, 12:33:17 PM »
छान प्रयत्न आहे! :) :) :)