Author Topic: तुही जगत असशील असाच माझ्या या प्रेमासाठी..........  (Read 1050 times)

Offline Maddy_487

  • Jr. Member
  • **
  • Posts: 145
  • Gender: Male

तुही जगत असशील असाच माझ्या या प्रेमासाठी..........
 
सनइचे सुर निनादणार,
दारांवर तोरणेही फुलणार,
रंग रांगोळीची सजावट दिसणार,
सगळीकड़े रोशणाई असणार,
सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसेल,
तरीही मनात एक व्यथा असेल,

मोरपिसासम तरलून गेलेले स्वप्न तुटल्याची,
 एकच जाणीव होतेय आयुष्यात मी हरल्याची.

भातुकलीचा खेळ खेळताना,
उद्याची स्वप्न रंगवत होते,
आज जे घडत आहे,
तेच स्वप्नात पाहत होते.

चुल, बोळकी, भातुकली सारे काही विसरले,
रिते माझे मन तुझ्या प्रेमाने भारावले.
 
तो शालू, चुडा, शृंगार सार काही हव होत,
या सर्वात तू माझ असण महत्वाच होत.

लवकरच मी आयुष्याच्या
अनोख्या वळणावर वाटचाल करेल
डोळ्यासमोर फक्त तुझीच
निस्वार्थी मूर्ती तरलेल.

तुझी बायको म्हणुन आयुष्यभर,
दिमाखात मिरवायच होत,
तुझी दुःख मला घेउन
तुला सुखी पहायच होत.

दुस्रयाची होउन मीच तुला
दुखाच्या दरीत ढकलल,
सुख नाही दिल तुला,
सुखाच कारणही हिरावल.

केवळ जगाच्या चालीरीतीसाठी मी त्याची दिसेल,
 मनाच्या कोंदणावर तुझच नाव असेल.

तुझ्याशिवायही जगेल रडत, तळमळत एकाच आशेसाठी,
तुही जगत असशील असाच माझ्या या प्रेमासाठी...............

                                              Auther Unknown


Jyane/jine lihili aahe khup sundar aahe.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):