Author Topic: …… एवढा अट्टाहास कशासाठी  (Read 807 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
.....देव-बामणाच्या साक्षीने सात फेरे मारल्यावरही
सप्तपदीतील प्रत्येक पावलांचा अर्थ उमजल्यावरही
…… एवढा अट्टाहास कशासाठी

ज्याचा नावाचे मंगळसूत्र लेऊनि नटली बोहल्यावरही
तोही तुझ्याशिवाय गोल - गोल जीवनाच्या भवर्यावरही
हातात हात देऊनी बापाने कन्यादान केल्यावरही
…… एवढा अट्टाहास कशासाठी

जन्माची १७ वर्ष एकजीव- एकरूप झाल्यावरही
दोन शरीर पण एकाच मनात राहणे आल्यावरही
सद्दैव तुझी सावली बनून राहिल्यावरही
…… एवढा अट्टाहास कशासाठी

काजवा होवून रात्रभर तुला झोपेत एकटक पाहिल्यावरही
कोवळ्या उन्हाचा किरण होवून सकाळी तुला उठवल्यावरही
रिमझिम पावसाची धार होवून तुला भिजवल्यावरही
…… एवढा अट्टाहास कशासाठी

गुलाबाचं एक फुल होऊन तुझ्या केसांमध्ये गुंतून राहिल्यावरही
मोग-याचा गंध होऊन श्वासासवे तुझ्यात विरघल्यावरही
तुला पाहताना, तो त्यालाही पूर्णपणे विसरून गेल्यावरही
…… एवढा अट्टाहास कशासाठी

तो तुझाच आहे हे सर्व जगी माहिती बनून छापल्यावरही
…… एवढा अट्टाहास कशासाठी