Author Topic: आठवणींची फुले  (Read 746 times)

Offline Shona1109

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
आठवणींची फुले
« on: May 17, 2013, 12:39:16 PM »
काल त्याच रस्त्यावरून गेली
तुझ्या आठवणींची फुले वेचत
प्रत्येक पावलाक्षणी तुला स्मरत
तो हि तसाच आहे अजून सदैव स्वागताला  तत्पर

मात्र एकटीला पाहून थोडा थबकला
पण स्वागताला कमी नाही पडला
जुन्या आठवणींचा  परत झाला उजाळा
माझ्यासवे तो हि त्या तितकाच  जगला
 
एका मागून एक असा आठवणींचा  Flashback  होत होता
रीळ संपत होती पण  स्मृतिना  End  मात्र नव्हता 
आठवून देत होता तुझ्यासोबतचा तो सुंदर प्रवास
एकत्र चालणारे आपण दोघ आणि मागे उरणाऱ्या पाऊल खुणा
 
हवेत उडणारी माझी केस बट
अन तिला कानामागे लपवणारे तुझे हात 
पावलागणिक आधार देणारी तुझी सावली
अन त्यामध्ये स्वतःला सावरणारी सावलीतली मी 

वाटत होत तुझ्यासोबत चाललेली सप्तपदी
आज मी एकटीच पूर्ण करते आहे कारण
एकत्र चालेल्या त्या  रस्त्यावर आज मी एकटीच आहे
सोबतीला मात्र  माझ्या अदृश्य तुझी छबी आहे….shona
 
 
 
 
 
 
 
 
 
« Last Edit: May 29, 2013, 10:53:09 AM by Shona1109 »

Marathi Kavita : मराठी कविता