Author Topic: पण तुझ्याविना भिकारी मी ठरलो ........  (Read 853 times)

Offline Shona1109

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
निळ्यानिळ्या आकाशात
पाहतो ग स्वप्न तुज
जेव्हा दाटुनी येती काळ ढग
वाहुनी जाई डोळ्यातली प्रत्येक सर
 
सतत आठवतो चेहरा तुझा
काळेभोर डोळ्यातली काळी निशा
हास्यातली कळी जेव्हा तुझी खुले
काळजाचा ठाव मग कुणालाच न कळे
 
धडधडणार हृद्य घेऊन मी जगतोय
प्रत्येक ठोक्यावर तुलाच स्मरतोय
एकटेपणाची सुई जेव्हा मनाला  टोचे
जगायला आता कारणच नाही उरले
 
तुझ्यात हसलो तुझ्यासाठी रडलो
शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यातच जगलो
धनवान होतो मी
पण तुझ्याविना भिकारी मी ठरलो...shona