Author Topic: पहिला पहिला पाऊस  (Read 989 times)

पहिला पहिला पाऊस
« on: June 04, 2013, 03:55:10 PM »
पहिला पहिला पाऊस,
रिमझीम बरसत होता...
पण
माझ्या डोळयांत तो,
धो धो कॉसळत होता...

तु आली होतीस,
सोडून जायचा विचार घेउन...
मी मात्र आलो होतो,
तुझीन माझी स्वप्न रंगवुन....

किती आशेने रंगवली होती,
मनात मी स्वप्न...
पण
तुझ्या एका शब्दाने,
झाली ति भग्न...

आजही तो पाऊस,
असाच रिमझीम येतो...
तु  भिजत असतेस,
मी मात्र तुझ्या आठवांत जळत असतो...

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline कवि - विजय सुर्यवंशी.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 478
  • Gender: Male
  • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: पहिला पहिला पाऊस
« Reply #1 on: June 05, 2013, 10:44:29 AM »
अप्रतिम

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: पहिला पहिला पाऊस
« Reply #2 on: June 05, 2013, 10:46:01 AM »
पहिला पहिला पाऊस,
रिमझीम बरसत होता...
पण
माझ्या डोळयांत तो,
धो धो कॉसळत होता...

छान … :)

Re: पहिला पहिला पाऊस
« Reply #3 on: June 09, 2013, 03:36:01 PM »
Dhanyavad
milind ji ani
कविवर्य - विजय सुर्यवंशी.