Author Topic: माझ्या नशिबात प्रेमच लिखित नाही ....  (Read 1392 times)

ही  हार  माझी नाही 

मी तर  हरतच आलो आहे
 
फाटक्या   ह्या ओंजळीतून  सुख सांडलेले
 
मी  नेहमीच  पाहत आलो आहे
 
तू गेलीस  आज
 
हे  ही  एक  दिवस होणारच होते
 
कारण माझ्या नशिबात प्रेमच  लिखित नाही ....
-
© प्रशांत शिंदे
१८-०६-२०१३

Marathi Kavita : मराठी कविता

वीणा

  • Guest
प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी ?

आपल्या या चारुतेशी विस्मरूनी जा सुकेशी
भाळता कोणास देशी का न भक्‍तीची सचोटी ?

प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग त्याची ही कसोटी.

कवी -    माधव ज्यूलियन

sundar  vina ji