Author Topic: सांग मला साथ देशील ना तु...  (Read 1678 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
जीवनभरची नाही मागत
फक्त क्षणभराचीच मागतोय
कारण प्रत्येक क्षण आता
तुझ्याशिवायच जगतोय
सांग मला साथ देशील ना तु...
तुझ्यासोबत जगावे
असे आता काही नाही तुझ्यात
तरी काही काळ माझ्यासोबत
जगशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
पहिली भेट सोडली तर आतापर्यंत
तु मला दुखच दिले आहेस
तरी काही क्षणासाठी तरी
भेटशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
तु मला नेहमीच फसवलस
अहंकारापोटी मोहोजालात अडकवलस
तरीही त्याच मोहोजालात
काही क्षण ठेवशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
तुझे खरे रूप आता मला कळले आहे
माझ्या विश्वासाचे जग आता तुटले आहे
तरी त्या खोट्या विश्वासातच मला
राहू देशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
माझ्या हृदयातले तुझे स्थान मात्र
अजूनही तसेच आहे
जरी खोटा असला तरी मी
त्याच आनंदात आहे
त्या खोट्या आनंदात तरी
मला ठेवशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
तु असे का केलेस ते
तुझे तुलाच माहित
माझे हृदय का तोडलेस ते
तुझे तुलाच माहित
माझ्या ह्या तुटलेल्या हृदयाला
परत जोडशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
खुप विश्वास होता तुझ्यावर
खुप प्रेम हि केले मी
आणि तु खेळलीस माझ्या भावनांशी
आता तरी हा खेळ
थांबवशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
असे म्हणतात देव सर्व पाहतो
सर्वांचा हिशोब फक्त
त्याच्याकडेच असतो
तुझ्यासारखा मी माझ्या प्रेमाचा
कधी हिशोब नाही ठेवला
सगळे हिशोब आता संपवशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
एवढे झाले तरी
आजूनही साद घालतोय
तुझ्याकडे खऱ्या प्रेमाची
याचना करतोय
जरी नाही देता आले खरे प्रेम
खोटे तरी देशील ना तु
सांग मला साथ देशील ना तु...
सांग मला साथ देशील ना तु...

... प्राजुन्कुश
... Prajunkush.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
तु मला नेहमीच फसवलस
अहंकारापोटी मोहोजालात अडकवलस
तरीही त्याच मोहोजालात
काही क्षण ठेवशील ना तु

chan ahe kavita... :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
apratim.....

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Prashantji... Rudraji...
... Dhanyavad.

DiptiMP

 • Guest
Apratim.. Sundar

Offline देवेंद्र

 • Jr. Member
 • **
 • Posts: 90
sundar lihila ahe

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
छान कविता  :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Devendraji... Sunitaji... Diptiji...
... Dhanyavad.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):