Author Topic: तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……  (Read 1847 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……

तुझे नसणे
जगण्यास माझ्या
ग्रहण जसे
स्वप्नवत सारे
स्वप्नातच तुझे भेटणे
अंश मी तुझे
कि माझ्यातच
अंश तुझे
चाहूल तुझी
कि भास मनाचे ……

दिस सरले
ऋतू बदलले
नभ एक चिमुकले
ओंजळीत माझ्या
नकळत  अवतरले
त्याचे बिलगणे
त्याचे खिदळणे
बा~ बा ~ असे
बोबडेच बोलणे
सारेच कसे लुभावणे ……

मज कळेना
तुझे नसणे
खंत असे
कि तुझे असणे
सत्य दुजे
दु:ख अंतरीचे
कि सुख परतीचे
आभास म्हणावे
कि मज आशिष तुझे
क्षण फसवे
खेळ नियतीचे
कि गतजन्मीचे
तुझे, स्वप्न अधुरे ……

मिलिंद कुंभारे

« Last Edit: July 04, 2013, 02:42:29 PM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
अतिशय सुंदर कविता  :)
मज कळेना
तुझे नसणे
खंत असे
कि तुझे असणे
सत्य दुजे
दु:ख अंतरीचे
कि सुख परतीचे
आभास म्हणावे
कि मज आशिष तुझे..........तुझी प्रतिछाया ओंजळीत माझ्या
                                   होईल का मी सांग ऋण उतराई तुझा.......... सुनिता

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
sweetsunita......फारच छान :)

तुझी प्रतिछाया ओंजळीत माझ्या ......
गतजन्मी राहून गेले ऋण काही फेडाया ……
पुन्हा लाभली तू मज होऊन एक  प्रतीछाया ……
ऋण फेडण्या हा जन्म माझा पुन्हा तुज मी अर्पिला ….

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
मस्त :) :)

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
कविता मनास अति भावली
    हासता ओंजळीतली प्रतिसावली
       आभास नाही ही चिमुकली
          सहवास सुखी करील पावलोपावली

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!

हासता ओंजळीतली प्रतिसावली
आभास नाही ही चिमुकली ....... :)

विजयाजी ..
फारच सुंदर …
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .... :)

Offline पिंकी

 • Newbie
 • *
 • Posts: 8
 • Gender: Female
nice.... :)  milind

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
सुंदर कविता 

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!

केदार दादा ...
धन्यवाद .... :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
धन्यवाद ....पिंकी.. :)