Author Topic: ये जवळ माझ्या तुला शेवटचे आज मिठीत घेऊ दे..  (Read 1024 times)

ये जवळ  माझ्या तुला शेवटचे  आज मिठीत  घेऊ दे ..
____________________________________________

तुझ्या डोळ्यांमधून मला माझे चित्र आज मिटवू दे
तू आज  दुसर्याची झाली आहेस
मग  मी कशाला तुझे  दुख म्हणून जगावे
लिह्ल्यात मी कविता तुझ्यावर
कधी काळी  तुला खूप आवडायच्या
माझ्याच साठी  लिहतोस ना
मग  मलाच  वाचून दाखवत जा  म्हणायची ...

तुझ्यावर लिहलेल्या एकूण एक कविता आज
ह्या पाण्यामध्ये  भिजवू दे
वाहून जाऊ दे त्यांना
तुझ्यासाठी त्या आता कवडीमोल आहे ..

नाही पहायचे मला माझ्या  ह्या कविता कुणी वाचाव्या
मग  त्याच्या हृदयाला स्पर्श करून
त्याचा हि कंठ  दाटावा....

एकच  मागणी आहे  माझी
ये जवळ  माझ्या तुला शेवटचे  आज मिठीत  घेऊ दे ....
-
• ©प्रशांत शिंदे•