Author Topic: हुर हुर ....  (Read 790 times)

Offline vinod.patil.12177276

  • Newbie
  • *
  • Posts: 45
हुर हुर ....
« on: July 07, 2013, 03:41:47 PM »

हुर हुर ..

तुझ्या  आठवात माझा
जिव गुंततो ग बाई
कालचीच भेट तरीही
ओढ तुझी ही संपत नाही

कितींदा नव्याने साज केला
वाट तुला ना अनोळखी
वेडीच आशा पामराला
घेवून येशील पालखी

सांजवेळ गेली तरी
ही हुर हुर कसली बाई
श्वास दाटतो ह्रुदयात अन
आसवाना अंत नाही

चांदण्याशी गुंजताना
वाट कालची पारखी
एका वाटे वरची पाऊले
तुझी नि माझी सारखी

चुकला काही मान माझा..
केवढा जिवाला घोर बाई
बोलला टाकुन जरी आता
कसलीच मला खंत नाही


            -  विनोद पाटील

Marathi Kavita : मराठी कविता