Author Topic: ते दोन क्षण...  (Read 1091 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
ते दोन क्षण...
« on: July 08, 2013, 10:21:26 PM »
ते दोन क्षण...
तुझ्यासह घालवलेले
तुलाच पाहात हरवलेले
सर्व जगाला विसरलेले
ते दोन क्षण...
प्रेमात पूर्ण बुडालेले
तुझ्या विरहात काढलेले
तुझी वाट पाहिलेले
ते दोन क्षण...
कधी दुखात विरलेले
मनापासून हसलेले
फक्त तुलाच वाहिलेले
ते दोन क्षण...
गप्पा गोष्टीत रंगलेले
रात्री जागून काढलेले
रडत रडत हसलेले
ते दोन क्षण...
रागावून रुसून बसलेले
तुझी समजूत काढलेले
तुझे अश्रू पुसलेले
ते दोन क्षण...
खांद्यावर डोके ठेवलेले
डोळ्यांत भरून राहिलेले
प्रेमात न्हाऊन गेलेले
ते दोन क्षण...
हृदय जोरात धडधडलेले
हातात हात घातलेले
बोटांत बोटे गुंफलेले
ते दोन क्षण...
एकटक पाहत बसलेले
तहान भूक विसरलेले
तु लाजून हसलेले
ते दोन क्षण...
भेटीसाठी आतुरलेले
तळमळत काढलेले
मरेपर्यंत जगलेले
ते दोन क्षण...
तुझे आणि माझेच
फक्त आपल्या दोघांचेच
मिळतील का परत
तसे च्या तसेच
ते दोन क्षण...
ते दोन क्षण...

... अंकुश नवघरे
...Ankush Navghare
« Last Edit: April 24, 2014, 12:48:10 AM by Ankush Navghare »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ते दोन क्षण...
« Reply #1 on: July 09, 2013, 03:38:58 PM »
anek don kshan...chan

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: ते दोन क्षण...
« Reply #2 on: July 09, 2013, 05:54:04 PM »
Kedar sir..
.. Dhanyavaad..
Tya don kshananche ata anek kshan zale ahet.

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: ते दोन क्षण...
« Reply #3 on: July 09, 2013, 08:02:41 PM »
छान कविता मनाला भिडणारी !अनेक क्षणांना प्रेमाने जपा बर का ! :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: ते दोन क्षण...
« Reply #4 on: July 11, 2013, 11:48:23 AM »
Dhanyavad Sunitaji...
.. Sarva japaley pan athavanich...