Author Topic: तूच नाहीस तर काहीच नाही....  (Read 1230 times)

आता खूप शांत शांत असतो,
आता मन कुठे रमतच नाही...
तेही आता मला बिल्गुंच बसलेल असत, काळोख्या रात्री चांदण्या मोजत...
आधी एक क्षणही माझ्या जवळ नसणार माझ मन, आज माझ्या सोबत थांबलय..
का त्याला विरह काय असतो अजून उमजलेलच नाही ..??

आठवतात तुझे ते शब्द
तुला कधी सोडून जाणार नाही,
 मग अचानक कशी गेलीस ग ..??
केवढ मोठ दुख दिलास तू मला,
 खरतर दुखांनी माझी पाठ कधी सोडलीच नाही म्हणा ...
ती आयुष्य भर पुरून उरणारी होती,
पण तेव्हा तू होती,  दुखणे भरलेलं मन तुझ्या पाशी मोकळ तरी करता येत होत ...
पण आता तूच नाहीस तर  काहीच नाही....

© कौस्तुभ