Author Topic: कधीतरी तु माझ्यावर नक्की प्रेम करशील...  (Read 1615 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
कितीतरी दिवस असेच गेले
आपली भेट होता होता
आता हे वर्षही संपत आले
असेच विरहात जगात जगता
वर्षाच्या शेवटी शेवटी तरी
चुकुन माझी आठवण काढशील,..पण
कधीतरी तुहि माझ्यावर नक्की प्रेम करशील...
आता नवीन वर्ष उगवणार
नवनवीन बदलांचे वारे वाहणार
पण माझ्यासाठी तु मात्र
अगदी आहेस तशीच राहशील,..पण
कधीतरी तुहि माझ्यावर नक्की प्रेम करशील...
आधी असे वाटायचे
की आपण एकाकी राहू शकतो
तुझ्यापासून दुर जाऊनही
आनंदाने जगू शकतो
पण आता समजतेय की
हे आता शक्य नाही
तुझ्याशिवाय मी म्हणजे
आत्म्याशिवाय देह नाही
माझ्या ह्या अविश्वासासाठी तु मला
जरूर माफ करशील,..पण
कधीतरी तुहि माझ्यावर नक्की प्रेम करशील...
नकळतपणे माझे मन
तुझ्या मध्ये गुंतले आहे
आता कळतेय हि मैत्री नसून
काहीतरी वेगळे आहे
मी जे अनुभवतोय तसेच
तु हि नक्की अनुभवशील,..पण
कधीतरी तुहि माझ्यावर नक्की प्रेम करशील...
तु दूर गेल्यामुळे
दुखाश्रूही सुकले आहेत
नभ त्यांचे बनून आता
मनामध्ये दाटले आहेत
कधीही ते आता अचानक बरसतील,..पण
कधीतरी तुहि माझ्यावर नक्की प्रेम करशील...
त्यांच्या बरसण्याने का होईना
माझ्या मनीचे भाव तुला कळतील
मनीचे भाव जाणता जाणता
माझ्या प्रेमालाही तु समजशील,..पण
कधीतरी तु माझ्यावर नक्की प्रेम करशील...
तु प्रेम कर अथवा नको
पण मी मात्र करताच राहणार
तु स्वप्न पाहा अथवा नको
मी मात्र पाहताच राहणार
मला खात्री आहे कधीतरी
माझी स्वप्ने तुही पाहशील,..पण
कधीतरी तु माझ्यावर नक्की प्रेम करशील...
कधीतरी तु माझ्यावर नक्की प्रेम करशील...


...प्रजुन्कुश
...Prajunkush

www.facebook.com/ankush.navghare.353
« Last Edit: August 09, 2013, 05:52:01 PM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
nyc poem  :)

किती रे झुरशील  मनातून तू
किती रे धरशील आस तिची तू
कधी तुझ्या मनाला खेळवतोयस
कधी तुझ्या हृदयाला जाळतोयस
विरहाची जाणीव स्वतःला करून देतोयस ?

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Swaraji..
.. Sundar lihiley tumhi..

shishir tarase

 • Guest
nyc poem  :)

किती रे झुरशील  मनातून तू
किती रे धरशील आस तिची तू
कधी तुझ्या मनाला खेळवतोयस
कधी तुझ्या हृदयाला जाळतोयस
विरहाची जाणीव स्वतःला करून देतोयस ?
nice

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female