Author Topic: आई तुझी खुप आठवण आली...  (Read 1319 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
आई तुझी खुप आठवण आली...
« on: August 06, 2013, 12:29:48 AM »
तशी राहतेस तु हृदयातच
पण आज भेटायची इच्छा झाली
आणि आज अचानक
आई तुझी खुप आठवण आली...
लहान असताना कधी
तुझा राग पण यायचा
पण खाऊ दिल्यावर मात्र
लगेच पळून जायचा
पण आता कळते
तुझी माया तु इथे नसताना
तीच आठवण आज   
अचानक दाटून आली
आणि आज अचानक
आई तुझी खुप आठवण आली...
ह्या अनोळखी जगात
नाती वाहवत आहेत
बालपणीची निरागस नाती
आज संपत आहेत
Nuclear Family च्या नावाखाली
मायेची माणसे दुरावत आहेत
विचार करून मन सुन्न झालेय
हरवलेला जिव्हाळा शोधतोय
अशी माझी गत झाली
आणि आज अचानक
आई तुझी खुप आठवण आली...
आज दोन घास मायेचे
भरवायला कुणी नाही
भरवणे सोडा नुसता जेवलास का
असही कुणी कुणाला विचारात नाही
आता आठवते जशी तु भरवायचि
हा चीउचा काऊचा करत
मागे पुढे धडपडायची
आज हॉटेलचं बेचव खाताना
तुझ्या हाताची गोडी कळली
आणि आज अचानक
आई तुझी खुप आठवण आली...
सगळे म्हणायचे आई म्हणजे देव
स्वामि तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी
पण तेव्हा त्याच महत्व नाही वाटायचं
पण आज कळतेय ह्या जीवनाला
आई शिवाय अर्थच नाही
आज ह्या गोठलेल्या मनाला
त्या उबेची महती कळाली
आणि आज अचानक
आई तुझी खुप आठवण आली...
खुप दिवस झालेत
शांत झोपलो नाही
सर्व आठवतेय जेव्हा तु
गोष्ठी सांगत पाठ थोपटून झोपवायची
त्या क्षणांसाठीच आजही
माझी पाठ आहे आतुरली
आणि आज अचानक
आई तुझी खुप आठवण आली...
आई आज तुला खुप miss करतोय
जरी दाखवता येत नसल तरी
मनातून मात्र खुप रडतोय
ये ना ग परत कर न परत तसच प्रेम
तुला भेटणं हीच मनाला आता
शेवटची ओढ लागली
आणि आज अचानक
आई तुझी खुप आठवण आली...
आई तुझी खुप आठवण आली...

... प्रजुन्कुश
... Prajunkush.

www.facebook.com/ankush.navghare.353
   
 

 
« Last Edit: August 09, 2013, 05:46:28 PM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Vrushalisarode

 • Guest
Re: आई तुझी खुप आठवण आली...
« Reply #1 on: August 07, 2013, 07:45:48 PM »
Sundar!!!

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: आई तुझी खुप आठवण आली...
« Reply #2 on: August 09, 2013, 11:38:15 AM »
Dhanyavad...

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: आई तुझी खुप आठवण आली...
« Reply #3 on: August 09, 2013, 02:27:02 PM »
ekach no. mitra

Offline manishsalunke

 • Newbie
 • *
 • Posts: 9
 • Gender: Male
 • Manish Salunke
  • CSS Matter
Re: आई तुझी खुप आठवण आली...
« Reply #4 on: August 09, 2013, 06:52:58 PM »
स्वामि तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आई तुझी खुप आठवण आली...
« Reply #5 on: August 10, 2013, 12:23:02 PM »

Prajunkush,
gr8.... :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: आई तुझी खुप आठवण आली...
« Reply #6 on: August 10, 2013, 03:27:45 PM »
Dhanyavad Milindji..

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: आई तुझी खुप आठवण आली...
« Reply #7 on: August 10, 2013, 03:28:44 PM »
Dhanyavad
...chexji.. Manish ji..