Author Topic: मला पुन्हा भेटण्याचा तु प्रयत्नही करु नकोस.....  (Read 749 times)

एक छोटीशी प्रेमकथा.....

एक मुलगा एका मुलीवर खुप करत होता,
आणि त्याने तिला प्रपोजही केलं,
तिचा होकारही मिळवला.....

जवळपास ३ ते ४ महीने,
ते रिलेशनशिप मध्ये होते,
आणि काही चुकीच्या गैरसमजा मूळे,
त्यांचे अचानक ब्रेकअप झाले.....

आणि ब्रेकअप करते वेळी,
त्या मुलाने त्या मुलीसाठी एक छोटीशी मनवेधक कविता केली.....

गैरसमज करुन नाते,
कधी तोडू नकोस,
जर नसेल विश्वास कुणावर,
तर त्याला आपलंही करु नकोस.....

खुप दुःख होते मनाला,
जेव्हा जवळची व्यक्ती दुरावते,
हात जोडूनी आहे,
कळकळीची विनंती तुला.....

पुन्हा कुणावर खोटे प्रेम करुन,
त्याच्या भावनेशी तु खेळू नकोस,
जात आहेस मला तु सोडून,
माझ्या जगण्याची तु
आसही करु नकोस.....

पुन्हा करणार नाही खरे प्रेम कुणावर,
आईची शपथ घेवूनी सांगतो,
पुन्हा माझा उदासलेला चेहरा पाहण्याचा,
स्वप्नाताही पाहण्याचा विचार नकोस.....

आयुष्य जगायचे होते फक्त तुझ्यासाठी,
ह्या आयुष्यालाच संपवण्याची वेळ आली तुझ्यापायी,
शेवटची भेट आहे ही आपली,
मला पुन्हा भेटण्याचा तु प्रयत्नही करु नकोस.....

मला पुन्हा भेटण्याचा तु प्रयत्नही करु नकोस..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!