Author Topic: आज शेवटीची भेट आहे आपली.....  (Read 810 times)

एक हृदयद्रावक कविता.....

आज शेवटीची भेट आहे आपली,
मनसोक्त माझ्यासाठी,
शेवटचं डोळे भरुन रडून घे.....

दोन क्षणात श्वास थांबेल माझा,
आज शेवटचं मला,
मन भरुन पाहून घे.....

आयुष्याची माझ्या माळ आज तुटणार आहे,
आज शेवटची घठ्ठ मिठी,
मला मारुन घे.....

काही क्षणात देवाचा निरोप येईल मला,
आज शेवटचं माझ्यासाठी,
झूरुन घे.....

कदाचित या पुढे मी तुला भेटणे शक्य नाही,
आज शेवटचं माझ्याशी,
मनसोक्त माझ्याशी भांडूण घे.....

आयुष्यात खुप त्रास दिला गं शोना मी तुला,
आज शेवटच्या माझ्या,
दोन कानाखाली मला मारुन घे.....

कदाचित आता डोळे माझे मिटतील ही,
आज शेवटचं माझ्यासाठी,
तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यांना वाहून घे.....

आयुष्याचा प्रवास संपतचं आलाय माझा,
आज शेवटची मला,
साथ मला देवून घे.....

मी मेल्यावर माझ्यासाठी एवढचं कर गं शोना,
माझ्या निष्पाप देहाला,
आग तुचं दे.....

माझा देह जाळाल्यावर त्याची झालेली राख,
आज तु ह्रदयावर तुझ्या,
लावून घे.....

खुप प्रेम दिलेस गं शोना तु मला,
आज शेवटच्या क्षणी आपल्या ख-या प्रेमाची,
झालेली माती पाहून घे.....

" I u Shona " :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: आज शेवटीची भेट आहे आपली.....
« Reply #1 on: August 12, 2013, 02:42:14 PM »
Sureshji..
... Hya kavitela.. Masta.. Chan.. Avadali.. Kasa mhanu.. Lagali manala khup... Pani ale dolyant..

Re: आज शेवटीची भेट आहे आपली.....
« Reply #2 on: August 12, 2013, 06:25:59 PM »
Prajunkush ji aabhari ahe