Author Topic: मी आज जाणार आहे.....  (Read 736 times)

मी आज जाणार आहे.....
« on: August 11, 2013, 03:57:15 PM »
मी आज जाणार आहे,
तुझ्यापासून,
कायमचेचं खूप दूर निघून.....

मी आज जाणार आहे,
तु दिलेली,
सर्व खोटी वचने मोडून.....

मी आज जाणार आहे,
माझ्या ह्रदयावर,
कोरलेले तुझे नाव खोडून.....

मी आज जाणार आहे,
तुझ्यासाठी गाळलेले,
सर्व अश्रूं कायमचेचं पुसून.....

मी आज जाणार आहे,
तुझ्यावर केलेले,
खरे जिवापाड प्रेम विसरुन.....

मी आज जाणार आहे,
तुझ्यासाठी,
स्वःतालाचं बदनाम करुन.....

मी आज जाणार आहे,
तुझ्याशी असलेलं,
प्रेमाचं नातं कायमचचं तोडून.....

मी आज जाणार आहे,
तु मनावर,
केलेल्या जखमा कुरवाळून.....

मी आज जाणार आहे,
कधी तुझ्यावर,
खरे प्रेम होते माझे हे विसरुन.....

मी आज जाणार आहे,
तुझ्या बरोबर,
पाहिलेले सर्व स्वप्ने मोडून.....

मी आज जाणार आहे,
तु रेखाटलेल्या,
सर्व प्रेमबंधाच्या रेषा ओलांडून.....

मी आज जाणार आहे,
तुझ्यासाठी,
ह्या जगातुन कायमचाचं मरुन.....

मी आज जाणार आहे,
तुझ्याशी असलेले,
ह्रदयाचे सर्व नाते संपवून..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: मी आज जाणार आहे.....
« Reply #1 on: August 12, 2013, 02:40:00 PM »
Vijay ji...
... Jari tumhi chalala ahat.. Kavita rupat matra tumhi ajaramar hot ahat.

Re: मी आज जाणार आहे.....
« Reply #2 on: August 12, 2013, 06:29:23 PM »
Prajunkush ji
dhanyvaad
mi chal lo ahe swata pasun dur
tari hi manat ahe hur hur