Author Topic: आजही डोळे माझे तुझीचं वाट बघतात.....  (Read 721 times)

तु आज जवळ नसताना माझ्या,
हे डोळे तुलाचं गं सारखे शोधतात,
तुझ्या आवडीच्या लाल रंगात कुणी दिसते तेव्हा,
हे डोळे त्या मुलीला तु समजुन फसतात.....

तु दिसावी नेहमी म्हणुन,
हे डोळे आपोआप बंद होतात,
तुला मन भरुन पाहण्यासाठी,
हे डोळे क्षणोक्षणी तरसतात.....

तुझी नेहमीच्या जागेवर वाट पाहताना,
हे डोळे आनंदाने अपोआप भरुन येतात,
तु येणा-या लोकलच्या ट्रेनच्या गर्दीमध्ये,
हे डोळे तुलाचं बघत असतात.....

त्यांना माहीत आहे,
तु येणार नाहीस जिवनात परत माझ्या,
हे डोळे तुझ्यासाठीचं गं झूरतात.....

तु माझी व्हावीस म्हणुन,
हे डोळे देवाकडे प्रार्थनेत तुलाचं मागतात,
तुला नेहमी जवळपास पाहण्यासाठी,
हे डोळे आतुरतेने तुझीचं वाट बघतात.....

तु जवळ नसल्याचा भास होतो तेव्हा,
हे डोळे एकांतात तुझ्यासाठीचं रडतात,
तुझीचं गं आठवण काढून,
हे डोळे अचानक बरसायला लागतात.....

मी अजुनही विसरु शकलो नाही तुला,
कारण ?????
आजही डोळे माझे तुझीचं वाट बघतात.....
आजही डोळे माझे तुझीचं वाट बघतात..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....