Author Topic: मला तुझी खुप आठवण येते.....  (Read 2993 times)

कधी कधी एकांतात मी,
तुझ्यासाठी खुप खुप रडते,
तु जर रागावलास माझ्यावर,
तर मला माझीचं खुप चिड येते.....

तु प्रेमाने बोललास माझ्याशी,
तर मला खुप खुप बरे वाटते,
किती जिवापाड प्रेम करते तुझ्यावर,
हे तुला बघताचं सांगायचे विसरुन जाते.....

तु फक्त माझाचं आहे आणि माझाचं राहशील,
हे मी स्वःताला प्रत्येक क्षणी ठामपणे बजावते,
तु दूर जरी असलास माझ्यापासून,
तरी तु माझा आहेस ही गोष्ट मनाला सुखावून जाते.....

खरचं खुप खुप आवडतोस तु मला,
पण हे तुला बोलायला मला खुप भिती वाटते,
कधी रे भेटशील मला,
तुझ्या ऐका मिठीसाठी नेहमी मी तरसते.....

पण ?????

तु अजुनही का येत नाहीस रे,
क्षणोक्षणी आपली भेट,
नेहमी अशी का लांबते,
अजुन किती रे वाट पाहू तुझी.....

खरचं रे शोन्या...!!

मला तुझी खुप आठवण येते.....

मला तुझी खुप आठवण येते.....

I Miss u Shonya... :( :( :(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Vishwasrao

  • Guest
Re: मला तुझी खुप आठवण येते.....
« Reply #1 on: August 13, 2013, 03:42:04 AM »
Sundar...