Author Topic: तु समोर येताच चटकन डोळ्यात पाणीच येतं.....  (Read 2318 times)

कधी कधी तु,
आठवलीस की,
खरच खुप खुप,
रडावसं वाटतं.....

खुप जिव जडला,
होता गं तुझ्यावर,
हे ओरडून ओरडून,
जगाला सांगावसं वाटतं.....

पण ???

तु नाही लागत आता,
माझी आपली कोणीच,
हेच दुःख मनाला,
राहून राहून बोचतं.....

कधी कधी नकळत,
आठवलीस तु की,
मन हे अचानक,
न सांगता भरुन येतं.....

काहीच अपेक्षा नव्हती गं,
माझ्या मनाची तुझ्याकडे,
मला तुझ्याकडून फक्त,
प्रेम आणि प्रेमच हवं होतं.....

पण ???

नाही समजलीस गं,
तु कधीच मला,
नाही समजल्या तुला,
कधीच माझ्या भावना.....

कधी कधी जुन्या क्षणानांच्या,
गोड आठवणी आठवताना,
तुझं चित्र डोळ्यासमोर,
आपोआप रेखटलं जातं.....

खुपकाही ऐकाचे होते तुझे,
खुपकाही सांगायचे होते तुला,
आता सर्वकाही,
संपल्या सारखं वाटतं.....

आता काहीच नाही गं,
उरलं तुझ्या माझ्यात,
राहीला फक्त तो भयानक,
दुरावा तुझ्या माझ्यातला.....

पण ???

तुला मनापासून एक,
खरं खरं सांगू का,
तु समोर येताच चटकन डोळ्यात पाणीच येतं.....
तु समोर येताच चटकन डोळ्यात पाणीच येतं..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
खूपच घाव सोसलेले दिसत आहे

कवीता सूरेख :-)

Vishwasrao

 • Guest
Sundar...
.. Kharach pani ale kavita vachun...

avadhut

 • Guest

Offline SONU@

 • Newbie
 • *
 • Posts: 3

Offline Shailesh2882

 • Newbie
 • *
 • Posts: 2