Author Topic: मी एकटाच ...............  (Read 916 times)

मी एकटाच ...............
« on: August 13, 2013, 01:18:22 PM »
आभाळाकडे पाहताना मी
.................... ढग  दाटून  येतं
मी  मात्र  तिथेच   बसतो तिला आठवत
जग  मलाच   वेड्यात  काढतं..........

येउन जातो पूर आसवांचा
...........................मी त्यांत  वाहून जातो
नसतो मग किनारा न कुणी तारणारा माझा
पाहत राहतो मृत्यूस मी
निघून  जातो दूर   तो  हि
दुखांसोबत मी  मात्र  तसेच  गुदमरून  जगतो ..............

दूर  दूर  जात  राहतो
तुलाच शोधत  राहतो
.......................वळणावर  येउन  थांबतो
तुझा भास होतो
अन .....
मी  गप्प  राहतो ..........

होईल का  कधी ऐसे
तू  स्वप्न नी
......................मी अस्तित्व  मी तुझे  ........

तू   भेटतेस तेव्हा
पुन्हा  काळोख  दूर  होतो
अन  दोघांच्या डोळ्यांत मग
..............................भूतकाळ डोळ्यातून  वाहतो .....

तू  गेल्यावर  मी  एकटाच  राहतो
पुन्हा त्या काळोखात  मी  हरवून जातो ................

मी  एकटाच  राहतो ............

-
लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•

दि .१३-०८-२०१३

« Last Edit: August 13, 2013, 01:32:53 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता