Author Topic: तू गेल्यावर.....  (Read 1014 times)

तू गेल्यावर.....
« on: August 13, 2013, 01:40:13 PM »
तू गेल्यावर.....

शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर,
ते जिवापाड मरतात.....

तू गेल्यावर.....

माझा मी एकटा,
गप्प बसून राहतो,
तू येणा-या क्षणांची,
आतूरतेने वाट पाहतो.....

तू गेल्यावर.....

आजही आठवते मला,
तुझे-माझे ते सरते दिवस,
पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर,
चांदण्याना जशी अमावस्या वाटते.....

तू गेल्यावर.....

आता फक्त मी,
शब्दानच्या सोबत चालत राहतो,
जुनेच शब्द पुन्हा घेऊन,
त्यात आपले दुःख गुंफून कविता करत राहतो.....

तू गेल्यावर.....

आता मला माझीच,
आठवण राहत नाही,
इतका अभागी तुझ्याशिवाय मी,
तुझ्याशिवाय मला करमतही नाही..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Moderator
  • Sr. Member
  • *****
  • Posts: 1,372
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: तू गेल्यावर.....
« Reply #1 on: August 13, 2013, 04:32:25 PM »
kavita changli ahe pan .......... jya vyaktila apali kahi kadar nahi .......... tya vyakti sathi zurat basne mhanje nivval murkhapana ahe ...........

sonuaghao

  • Guest
Re: तू गेल्यावर.....
« Reply #2 on: August 14, 2013, 12:10:55 PM »
tumi khup vedepana kart aahe karn te athun jivan jagayache aste