Author Topic: माझ्या नशिबात देवाने, प्रेम लिहिलेचं नाही.....  (Read 1121 times)

का कधी कोणी,
घट्ट मिठीत घेतलेचं नाही,
का कधी कोणी,
रुसलो असेल तर प्रेमाने समजावलेचं नाही.....

डोळ्यातील अश्रूं स्वतःचे,
स्वतः पुसले नेहमी,
कारण,
माझ्या नशिबात देवाने,
प्रेम लिहिलेचं नाही.....

का कधी कोणी,
माझ्या भेटीची आसचं
केली नाही,
का कधी कोणी,
तासन तास माझी वाटचं पहिली नाही.....

का कधी कोणी,
नयनाना सप्तरंगी स्वप्न दाखवले नाही,
कारण,
माझ्या नशिबात देवाने,
प्रेम लिहिलेचं नाही.....

का कधी कोणी,
हातात हात माझा घेतलाचं नाही,
का कधी कोणी,
मी तुझीचं आहे असं बोललीचं नाही.....

का कधी कोणी,
नाही घेतली शपथ
माझ्या प्रेमाची,
कारण,
माझ्या नशिबात देवाने,
प्रेम लिहिलेचं नाही.....

का कधी कोणी,
माझ्या सोबत पावसात भिजलचं नाही,
का कधी कोणी,
डोळ्यात डोळे घालून चार शब्द बोललीचं नाही.....

का कधी कोणी,
माझ्या मनातील
भावना ऐकल्याचं नाही,
कारण,
माझ्या नशिबात देवाने,
प्रेम लिहिलेचं नाही.....

का कधी कोणी,
माझी स्वप्न रंगवत रात्र रात्र जागलचं
नाही,
का कधी कोणी,
माझ्या सोबत स्वतःचं आयुष्य पाहिलेचं
नाही.....

का कधी कोणी,
माझ्या वाचून मनाने व्याकूळ झाले नाही,
कारण,
माझ्या नशिबात देवाने,
प्रेम लिहिलेचं नाही..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Moderator
  • Sr. Member
  • *****
  • Posts: 1,372
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
nice poem .............. but be positive .......... tuzyasathi may be dev ekhadi special mulagi ghadavat asel ji tuzya kharya premala samjun gheil ...... mhanun etka time lavat asel tila tuzya aayushyat anayala :) ...

Amrut

  • Guest