Author Topic: तुझ्याशिवाय खरं तर करमतच नाही मला.....  (Read 804 times)

का वागलीस गं तु अशी,
खरच कळले नाही मला,
प्रेमाचा खेळून खेळ खोटा झालीस मोकळी,
ह्रदयावर करुन घाव आनंद भेटला तुला.....

खुप काही होते देण्यासारखे,
जे घेताच आले नाही तुला,
मनाला करुन बेचैन माझ्या,
भावनांचा खेळण्याचा डाव तु मांडला.....

माझे मन दुःखवण्याचे,
मीच दिले होते गं तुला,
सुखाच्या लख्ख उजेडात ही,
विरहाचा अंधार का तु केला.....

चुक माझीच होती गं,
जे माझे आयुष्य समजले तुला,
दुःखाच्या लोटून सुख ओरबाडून,
तडफडत मरण्याचा शाप तु दिला.....

बाप्पाच्या दरबारात असताना,
तुच मागितले होतेस गं मला,
आज त्याच बाप्पाच्या दरबारात,
दुरवण्याचा वर तु मागितला.....

जिथे जाशील तिथे सुखी रहा,
याच शेवटच्या शुभेच्छा तुला,
मी जगेल कसा ही अडखळत,
तु मात्र सांभाळ गं स्वतःला.....

माझ्या मनाची होणारी घालमेल,
कधीच गं कळणार नाही तुला,
मला सोडून खुश आहेस तु,
तुझ्याशिवाय खरं तर करमतच नाही मला.....

तुझ्याशिवाय खरं तर करमतच नाही मला..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
भावना तुझ्या खोट्या नव्हत्या
प्रेम तुझे खोटे नव्हते
आठवणी तुझ्या खोट्या नव्हत्या
पण प्रेयसी मात्र तुझी खोटी होती

" जिथे जाशील तिथे सुखी रहा,
 याच शेवटच्या शुभेच्छा तुला,
 मी जगेल कसा ही अडखळत,
 तु मात्र सांभाळ गं स्वतःला....."

लाईन आवडली मित्रा छान होतीस रे
शुभेच्छा पुढील वाटचाली साठी :)

   Çhèx Thakare
dhanyvaad