Author Topic: तू म्हणायची................  (Read 743 times)

तू म्हणायची................
« on: August 14, 2013, 03:29:17 PM »
तू म्हणायची   जाताना नेहमी येते म्हणायचं
मी  तेव्हा  हसायचो
आपण  कुठे दूर  जाणार  आहोत
सांगून तुलाच  मी वेडी म्हणायचो ..........

तू म्हणायची  मी तुला साथ देईल  आयुष्यभर
मी म्हणायचो तुझ्या श्वासात मला आहे जगायचं
आज  साथ हि नाही अन  श्वास हि थांबला
जोडलेली हि नाती आपण
आज  दैवानेही  खेळ मांडला .............

माझी काळजी करणारी तू
काळजालाच मारले 
विरहाचे  दुख  घेऊन  शपथ  दिले  जगायचे ............

कसे  जगायचे  मी तुझ्याविना 
तेव्हा  तूच  मला विचारायचे
अन तुला i  love  u  म्हणून ती  वेळ मी टाळायचे

किती  फरक आहे बघ आता शोना
तू बोललीस  ते आज सर  काही खरे  झालं
पण तु जे  विचारायची  ते  आज  मी  पाहतोय

दुख  हे विरहाचे आता  मी भिजल्या  डोळ्यांनी बघतोय.............

-

लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•
दि.१४-०८-२०१३

Marathi Kavita : मराठी कविता