Author Topic: शोना आजही तुझी मला खुप उणीव भासते.....  (Read 615 times)

आठवण तुझी आली की,
मला खुप खुप रडावेसे वाटते,
का समजुन घेतले नाहीस तु मला,
हेच दुःख मनाला बोचते.....

किती प्रेम होते माझे तुझ्यावर,
हे जगाला ओरडून सांगावेसे वाटते,
पण आता मी नाहीच कोणी तुझा,
हे आठवताच मन नकळत रडते.....

कसे आणि किती सांगु तुला,
प्रेमात त्यागाला किती महत्व असते,
कधीच नाही समजले माझे प्रेम तुला,
हीच खंत राहून राहून टोचते.....

मी कितीही रडलो तुझ्यासाठी,
तरीही ते तुला खोटेच भासते,
शेवटचा निरोप घेतानाही कळले मला,
तु अजुनही माझ्यासाठीच रडते.....

पण ???

बोलून दाखवण्याची हिँमत नाही म्हणुन,
तु मला स्वप्नात येऊन छळते,
आजही मी फक्त तुझाच आहे,
ह्रदयाच्या स्पंदनात तुच धडकते.....

तुझेही तेवढेच प्रेम आहे माझ्यावर,
मन हे मला नेहमी सांगते,
पुन्हा एकदा परतूनी ये ना गं,
फक्त आपल्या ख-या प्रेमासाठी.....

खरचं गं पिल्लू तुझ्याशिवाय करमत नाही मला,

कारण ???

शोना आजही तुझी मला खुप उणीव भासते.....

शोना आजही तुझी मला खुप उणीव भासते..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....