Author Topic: तुझा जोडीदार व्हायला.....  (Read 634 times)

तुझा जोडीदार व्हायला.....
« on: August 14, 2013, 06:39:38 PM »
कसे गं मी समजावू,
या माझ्या वेड्या मनाला,
तु सोडून गेल्याचे दुःख,
सांगु तरी मी कुणाला.....

आजही तु माझीच आहे,
हे कळतच नाही गं कसे तुला,
मी तुझा कोणीच लागत नाही,
कसे पटवून देऊ मी ह्रदयाला.....

का गं असं सोडलस तु,
काळीमा फासलास ख-या प्रेमाला,
आज दुःखाचे आभाळही कोसळले माझ्यावर,
खुप यातना होतात प्रत्येक क्षणाला.....

मनही गहीवरुन येते गं नकळत,
खुप त्रास होतो गं माझ्या जिवाला,
फक्त एकदाच ये शेवटच,
मला मनभरुन पहायला.....

ती शेवटची भेट साठविन मी,

पुढच्या जन्मी
तुझा जोडीदार व्हायला.....
तुझा जोडीदार व्हायला.....
तुझा जोडीदार व्हायला.....  :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता