Author Topic: सांग ना रे सख्या येशील ना परत  (Read 596 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
आज पुन्हा त्याला पहिले, पुन्हा एकदा मनाला खूप छान वाटले....
   जुन्या स्वप्नांना एक नवी पालवी फुटली,
आपली नसलेली स्वप्ने परत एकदा आपली वाटली.....
   त्याच्या डोळ्यात तोच निरागसपणा जाणवला,
माझा नाही तो पण जणू माझाच भासला......
    कधीतरी एकत्र बोलायचो, गप्पा मारायचो,
पण आता मात्र एकांताचा चटका मनाला लागला.....
   काय होते? आपले वेगळे होण्याचे कारण, अजूनही मी जाणले नाही त्याचे उत्तर....
त्याला विचारून हि पहिले, पण तो नेहमीसारखा मुग्ध आणि शांत राहतो,
  या सगळ्या आठवणींचा वणवा मला मात्र जाळतो......
अजूनही मी त्याच वळणावर उभी आहे, सांगेल तो कारण वेगळे होण्याचे,
  ह्याच एका आशेत जगत आहे.....
तो दूर होऊन सारी स्वप्ने मिटवून गेला,
    पण त्याच स्वप्नांना मी माझ्या हृदयात आसरा दिला....
सोडून गेला तो मला, तरीही मी त्याची वाट पाहत आहे,
  कधीतरी मागे वळून बघ, मी अजून तिथेच उभी आहे....
आस आहे या वेड्या मनाला येशील तू परत,
   सांग ना रे सख्या येशील ना परत, तो पर्यंत आहे मी तील तील मरत....!!!! @ कविता @